नवी दिल्ली, ५ ऑगस्ट : येमेनच्या पश्चिम किनाऱ्याजवळ Red Sea मध्ये भारतीय ध्वजावरील MSV Faize Noore Oliya या व्यापारी जहाजावर Projectile हल्ला झाल्यानंतर ते समुद्रात बुडाले. जहाजावरील १३ भारतीय नागरिकांसह एकूण १४ खलाशांची Yemeni Coast Guard ने सुखरूप सुटका केली असून सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती भारत सरकारने दिली आहे.
🚢 येमेनजवळ Red Sea मध्ये भारतीय जहाजावर हल्ला !
🇮🇳 भारतीय ध्वजावरील MSV Faize Noore Oliya जहाज बुडाले
👨✈️ १३ भारतीयांसह सर्व १४ खलाशी सुखरूप
🛟 Yemeni Coast Guard ने केले बचावकार्य
🇮🇳 भारताकडून हल्ल्याचा तीव्र निषेध🔗 https://t.co/5zeDnfGeKA#RedSea #Yemen #India pic.twitter.com/LIBfMU5aC8
— Kalyan Vaibhav News (@KalyanVaibhav10) August 5, 2026
हल्ल्यानंतर जहाज बुडाले
अधिकृत माहितीनुसार, जहाजावर येमेनमधील हुदैदाह (Hodeidah) बंदराच्या दक्षिणेस सुमारे १३ नॉटिकल मैलांवर असताना Projectile ने हल्ला झाला. हल्ल्यानंतर जहाजाला गंभीर नुकसान झाले, ते कलंडले (Capsize) आणि अखेरीस समुद्रात बुडाले.
सर्व खलाशी सुरक्षित
जहाजावरील १३ भारतीय आणि एका येमेनी नागरिकासह सर्व १४ खलाशांना येमेनी अधिकाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढून मोखा (Mokha) बंदरात आणले. जखमींना आवश्यक वैद्यकीय मदतही देण्यात आली आहे.
भारताचा तीव्र निषेध
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) या हल्ल्याचा तीव्र निषेध करत Red Sea मधील व्यापारी जहाजांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. तसेच रियाधस्थित भारतीय दूतावास येमेनी अधिकाऱ्यांशी समन्वय साधून बचावलेल्या खलाशांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले आहे.
Red Sea मधील भारतीय जहाजावरील पहिलाच हल्ला
वृत्तानुसार, Red Sea मध्ये भारतीय ध्वजावरील जहाजावर झालेला हा पहिलाच हल्ला मानला जात आहे. हा भाग Hormuz सामुद्रधुनीपासून दूर असला, तरी गेल्या काही वर्षांपासून या परिसरात व्यापारी जहाजांवरील सुरक्षा धोके आणि हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीबाबत चिंता कायम आहे.

