बेंगळुरू, ४ मे — भारताच्या खासगी अवकाश क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा गाठत GalaxEye या बेंगळुरू स्थित स्टार्टअपने आपला प्रमुख सॅटेलाइट ‘Mission Drishti’ यशस्वीपणे प्रक्षेपित केला आहे. हा सॅटेलाइट SpaceX च्या Falcon 9 रॉकेटद्वारे अमेरिकेतील कॅलिफोर्नियातून कक्षेत पाठवण्यात आला.
🚨 भारताच्या खासगी अवकाश क्षेत्रात ऐतिहासिक झेप ! 🚀🇮🇳
GalaxEye चा ‘#MissionDrishti’ सॅटेलाइट SpaceX Falcon 9 वरून यशस्वी प्रक्षेपित.
👉 ~190 किलोग्रॅम वजन
👉 भारतातील सर्वात मोठा प्रायव्हेट Earth Observation सॅटेलाइटपूर्ण बातमी वाचा : – https://t.co/ldEavQp2hN pic.twitter.com/rdz1lSySoF
— Kalyan Vaibhav News (@KalyanVaibhav10) May 4, 2026
सुमारे १९० किलोग्रॅम वजनाचा ‘Mission Drishti’ हा भारतातील खासगी क्षेत्रात विकसित करण्यात आलेला सर्वात मोठा Earth Observation सॅटेलाइट मानला जात आहे. विशेष म्हणजे, हा जगातील पहिला OptoSAR सॅटेलाइट असून, यात optical imaging आणि synthetic aperture radar (SAR) या दोन्ही तंत्रज्ञानाचा एकत्रित वापर करण्यात आला आहे.
या प्रगत तंत्रज्ञानामुळे सॅटेलाइटला ढग, अंधार किंवा धूर यांमधूनही स्पष्ट प्रतिमा मिळवता येतात, ज्यामुळे दिवस-रात्र आणि कोणत्याही हवामानात पृथ्वीचे अचूक निरीक्षण शक्य होते. याचा वापर संरक्षण, शेती, आपत्ती व्यवस्थापन आणि शहरी नियोजन यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत होणार आहे.
GalaxEye ही कंपनी IIT Madras येथील माजी विद्यार्थ्यांनी २०२१ मध्ये स्थापन केली असून, भारतातील वाढत्या स्पेस-टेक स्टार्टअप इकोसिस्टमचे हे महत्त्वाचे उदाहरण मानले जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, ‘Mission Drishti’ चे यशस्वी प्रक्षेपण हे केवळ एका सॅटेलाइटपुरते मर्यादित नसून, भारताच्या खासगी अवकाश क्षेत्रातील क्षमतांचा जागतिक स्तरावर दाखवणारा मोठा टप्पा आहे. भविष्यात अशा प्रगत सॅटेलाइट्समुळे भारताला geospatial intelligence आणि surveillance क्षेत्रात मोठी आघाडी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

