नवी दिल्ली, ४ ऑगस्ट : भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी IndiGo ने आपल्या २० वर्षांच्या प्रवासानिमित्त प्रवाशांसाठी विशेष ‘IndiGoFree’ मोहीम जाहीर केली आहे. या अंतर्गत २०,००० देशांतर्गत विमान तिकिटे मोफत देण्यात येणार असून, निवड झालेल्या प्रवाशांना त्यांच्या तिकिटाच्या भाड्याचा (Fare) ₹१०,००० पर्यंत पूर्ण Refund दिला जाणार आहे. ही ऑफर ४ ते ६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत केलेल्या पात्र (Eligible) बुकिंगसाठी लागू असेल.
ऑफरचा लाभ कसा मिळणार?
ही ऑफर IndiGo च्या अधिकृत Website, Mobile App किंवा 6Eskai AI Virtual Assistant द्वारे केलेल्या Domestic Economy आणि IndiGoStretch बुकिंगसाठीच लागू आहे. International Flights, Codeshare Flights किंवा इतर Travel Portals/Agents मार्फत केलेली बुकिंग या योजनेसाठी पात्र ठरणार नाही.
Random Selection द्वारे निवड होणार
सर्व पात्र बुकिंगमधून Random System-Generated Process द्वारे विजेत्यांची निवड केली जाईल. निवड झालेल्या ग्राहकांना नोंदणीकृत Email आणि WhatsApp वर एक सोपा प्रश्न पाठवला जाईल. त्या प्रश्नाचे तीन प्रयत्नांत योग्य उत्तर दिल्यास संबंधित बुकिंगच्या तिकिटाचे भाडे ₹१०,००० पर्यंत Refund केले जाईल.
एकाच ग्राहकाला एकदाच संधी
कंपनीच्या अटींनुसार, प्रत्येक Mobile Number आणि Email ID वरून केवळ एकदाच विजेता म्हणून निवड होऊ शकते. तसेच Refund संबंधित प्रक्रिया ३ ते ५ कामकाजाच्या दिवसांत पूर्ण केली जाईल.
२० वर्षांचा यशस्वी प्रवास
४ ऑगस्ट २००६ रोजी पहिल्या उड्डाणाने सेवा सुरू केलेल्या IndiGo कडे आज ४३० हून अधिक विमानांचा ताफा असून, कंपनी १४० पेक्षा अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांवर सेवा देते. गेल्या दोन दशकांत सुमारे ९० कोटी प्रवाशांनी IndiGo ची सेवा घेतली आहे.
थेट बुकिंगला प्रोत्साहन
तज्ज्ञांच्या मते, या मोहिमेचा उद्देश केवळ वर्धापनदिन साजरा करणे नसून, ग्राहकांना थेट IndiGo च्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून बुकिंग करण्यासाठी प्रोत्साहित करणे हाही आहे. यामुळे कंपनीचे तृतीय-पक्ष बुकिंगवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल.

