नवी दिल्ली, ५ जून — भारतातील ग्राहकांना Vegan आणि Vegetarian खाद्यपदार्थांमधील फरक स्पष्टपणे ओळखता यावा यासाठी Food Safety and Standards Authority of India (FSSAI) ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ जुलै २०२७ पासून सर्व मंजूर Vegan खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगवर अधिकृत Vegan Logo लावणे अनिवार्य असेल.
नव्या नियमानुसार, पॅकेजिंगवर हिरव्या रंगाच्या चौकटीत ‘V’ अक्षर, त्यावर पानाचा अंकुर आणि खाली ‘VEGAN’ असा मजकूर असलेला अधिकृत लोगो छापावा लागणार आहे. हा लोगो ग्राहकांना Vegan उत्पादने सहज ओळखण्यास मदत करेल.
FSSAI च्या नियमानुसार Vegan खाद्यपदार्थ म्हणजे असे पदार्थ ज्यामध्ये कोणतेही प्राणीजन्य घटक, प्राणीजन्य पदार्थ, Addictive किंवा प्रक्रिया सहाय्यक (Processing Aids) वापरलेले नसतात.
या निर्णयामुळे वाढत्या Plant-Based Food Industry ला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच Vegetarian आणि Vegan उत्पादनांबाबत होणारा ग्राहकांचा संभ्रम कमी होण्यास मदत होणार आहे.
FSSAI ने Food Business Operators (FBOs) ना पॅकेजिंग आणि लेबलिंगमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी १ जुलै २०२७ पर्यंतचा संक्रमण कालावधी दिला आहे. आयात करण्यात येणाऱ्या Vegan उत्पादनांनाही हे नियम लागू असतील.
तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय ग्राहक संरक्षण, पारदर्शकता आणि अन्नपदार्थांच्या योग्य वर्गीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात असून, भारतातील Vegan Food Market साठी हा एक मोठा टप्पा ठरणार आहे.

