नवी दिल्ली / पोर्ट ब्लेअर, ५ जून — भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाची घडामोड घडली असून, सरकारी तेल आणि वायू कंपनी Oil India Limited (OIL) ने अंदमान किनाऱ्याजवळील ऑफशोअर ब्लॉकमध्ये नैसर्गिक वायूचा आणखी एक महत्त्वपूर्ण शोध लागल्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या श्री विजयपुरम-३ (Sri Vijayapuram-3) या शोध विहिरीत नैसर्गिक वायूचे अस्तित्व आढळले असून, हा त्याच ब्लॉकमधील दुसरा यशस्वी Hydrocarbon शोध ठरला आहे.
⛽🚨 अंदमान किनाऱ्याजवळ नैसर्गिक वायूचा मोठा शोध !
Oil India ला पुन्हा यश :
✔️ श्री विजयपुरम-३ विहिरीत Gas Discover
✔️ खोदलेल्या ३ पैकी २ विहिरी यशस्वी
✔️ भारताच्या ऊर्जा सुरक्षेला मोठे बळ🌐 https://t.co/tk3ngoyfqR#OilIndia #NaturalGas #Andaman pic.twitter.com/R4GPdNJJ95
— Kalyan Vaibhav News (@KalyanVaibhav10) June 5, 2026
Oil India च्या माहितीनुसार, ही विहीर अंदमान बेटांच्या पूर्व किनाऱ्यापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर आणि सुमारे ३५५ मीटर पाण्याच्या खोलीत खोदण्यात आली आहे. प्राथमिक उत्पादन चाचण्यांमध्ये नैसर्गिक वायूची उपस्थिती स्पष्ट झाली असून, विहिरीतून सतत गॅस फ्लेअरिंग दिसून आल्याने शोधाची पुष्टी झाली आहे.
विशेष म्हणजे, या ऑफशोअर ब्लॉकमध्ये आतापर्यंत खोदण्यात आलेल्या ३ शोध विहिरींपैकी २ विहिरींमध्ये Hydrocarbon सापडले आहेत. यापूर्वी श्री विजयपुरम-२ विहिरीतही नैसर्गिक वायूचा शोध लागला होता. त्यामुळे अंदमान बेसिनमध्ये मोठ्या प्रमाणात तेल आणि वायू साठे असण्याच्या शक्यतांना आणखी बळ मिळाले आहे.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या शोधाचे स्वागत करत अंदमान समुद्रात “ऊर्जा संधींचा महासागर” उघडत असल्याचे म्हटले आहे. तज्ज्ञांच्या मते, म्यानमार आणि इंडोनेशियामधील मोठ्या वायू साठ्यांच्या पट्ट्याशी अंदमान बेसिनची भूवैज्ञानिक रचना मिळतीजुळती असल्याने भविष्यात आणखी मोठे शोध लागण्याची शक्यता आहे.
जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंता वाढत असताना आणि ऊर्जा सुरक्षिततेला महत्त्व प्राप्त होत असताना, अंदमानमधील हा शोध भारतासाठी रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे देशांतर्गत नैसर्गिक वायू उत्पादन वाढवण्यास मदत होऊ शकते तसेच आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना बळ मिळू शकते.

